नवीन बीड एसपी: नवनीत कुमार कावत

नवीन बीड एसपी: नवनीत कुमार कावत

नवनीत कुमार कावत हे एक आयपीएस अधिकारी असून सध्या छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे झोन २ चे उपायुक्त (डीसीपी) म्हणून कार्यरत आहेत. ते आता बीडचे नवे एसपी म्हणून नियुक्त झाले आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर नवनीत कुमार कावत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.कावत हे २०१७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.

अविनाश बारगळ यांच्या बदलीची घोषणा काल सभागृहात करण्यात आली होती. त्यानंतर बीडला पोलीस अधिक्षक म्हणून कोण येणार, याची सर्वांना उत्सुकता होती. या पदासाठी अनेक नावांची चर्चा असतानाच शासनाने नवनीत कावत यांची नियुक्ती केली आहे.

कावत मूळचे राजस्थानचे असून २०१७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी धाराशिव येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे आणि सध्या ते छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस उपायुक्त होते. एक शांत पण ठाम अधिकारी अशी त्यांची ओळख आहे.

नवनीत कुमार कावत यांचा परिचय:

  • शैक्षणिक पार्श्वभूमी: ते इलेक्ट्रिकल इंजिनिअर असून पूर्वी आयआरएसईई आणि आयआरएस(आयटी) मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम केले आहे.
  • शारीरिक तंदुरुस्ती: ते क्रीडा आणि फिटनेस उत्साही आहेत. त्यांनी सैनीक स्कूल चित्तौडगड आणि आयआयटी रूडकी येथे शिक्षण घेतले आहे.
  • विद्यार्थ्यांसोबत संवाद: त्यांनी एमजीएम युनिव्हर्सिटीतील विद्यार्थ्यांना कायदा, नेतृत्व आणि नागरी जबाबदारी यावर मार्गदर्शन केले आहे.
  • महत्त्वाचे प्रकरणे: त्यांनी आंतरजातीय विवाहातील खून प्रकरणाची तपासणी केली आहे आणि पीडित व तिच्या सासरच्या मंडळींना सुरक्षा प्रदान केली आहे.
  • नवीन प्रकल्प: त्यांनी लोकांच्या पोलीस स्टेशनमधील अनुभव सुधारण्यासाठी क्यूआर कोडद्वारे फीडबॅक देण्याचा पायलट प्रकल्प सुरू केला आहे.

अविनाश बारगळ यांचे कालच उचलबांगडी केली होती.  नवनीत कुमार कावत यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था अधिक सुदृढ होईल अशी अपेक्षा आहे.

error: Content is protected !!