क्रिकेट विश्वात एक मोठी बातमी समोर येत आहे. टीम इंडियाचा माजी फलंदाज रॉबिन उथप्पा विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. 39 वर्षीय फलंदाजावर प्रोविडेंट फंड घोटाळ्याचा आरोप आहे. हे वॉरंट पीएफ आयुक्त सदक्षरी गोपाल रेड्डी यांनी जारी केले आहे.
रेड्डी यांनी बजावलेल्या वॉरंटनंतर पुलकेशीनगर पोलिसांना आवश्यक कारवाई करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. रॉबिन उथप्पा यांच्या निवासस्थानी विजयगड येथे दाखल झाले आहेत