एकदाच काय दूध का दूध, पाणी का पाणी होऊ जाऊ द्या… – धनंजय मुंडे

विधिमंडळात माझ्या सहकाऱ्याच्या संबंधित एखाद्या घटनेची चर्चा चालू असेल आणि त्या चर्चेचे उत्तर मुख्यमंत्री देत असतील तर परंपरेनुसार मी सदरात उपस्थित राहिलो नाही. त्याशिवाय सभागृहात उपस्थित न राहण्याचे दुसरे कुठलेही कारण नाही. विरोधक काहीतरी बोलणार, त्यावर माझ्याकडून बोललं जाणार, त्यावर मुख्यमंत्र्यांना उत्तर द्यायला अडचण होणार असे धनंजय मुंडेंनी स्पष्ट केले. त्यांनी असेही म्हटले की, “जे काही असेल ते एकदाच काय दूध का दूध, पाणी का पाणी होऊ जाऊ द्या… मुख्यमंत्र्याच्या उत्तरातून ते कळलं देखील.”

मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलंय आणि समाधान झालंय. धनंजय मुंडेंनी सुरुवातीपासूनच सांगितले आहे की, हे घरातलं झालेलं भांडण आहे आणि त्यातूनच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली आहे. या प्रकरणात तीव्र भावना सर्वांची आहे. एस.आय.टी नेमलेली आहे आणि याचा तपास होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी मकोका लावण्याच्या बाबतीत स्पष्ट केले आहे की, तो फक्त या प्रकरणात लावायचा आहे की यापुढे अशा प्रकरणात लावायचा आहे. त्यामुळे सर्वांचं समाधान झालं आहे. धनंजय मुंडेंनी असेही म्हटले आहे की, या घटनेत ज्यांनी कोणी अशा पद्धतीने हत्या केली, त्यांना सर्वांना फाशी झाली पाहिजे ही त्यांची भूमिका आहे.

error: Content is protected !!