वाल्मिक कराडला अटक करा: संदीप क्षीरसागर
बीड जिल्ह्यात एक भयानक घटना घडली आहे. संतोष देशमुख नावाच्या सरपंचाचा दिवसाढवळ्या खून करण्यात आला आहे, आणि या हत्येच्या मागील मास्टरमाइंडचा शोध लागलेला नाही. संदीप क्षीरसागर यांनी वारंवार तक्रारी करताना वाल्मिक कराड याचे नाव घेतले आहे.
मुख्यमंत्री साहेब, माझी विनंती आहे की, आमदार म्हणून आम्हाला एक बॉडीगार्ड मिळतो, तर क्रिमिनल माणसाला दोन-दोन बॉडीगार्ड कसे मिळतात? असा सवाल संदीप क्षीरसागर यांनी केला.
वाल्मिक कराड याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिक कराडचे नाव घेतलेले नाही. जे गुन्हेगार सापडले आहेत, त्यांचे कॉल रेकॉर्ड आणि वाल्मिक कराड याचे कॉल रेकॉर्ड जर तपासले, तर पूर्णपणे जो काही खून झाला ते समोर येईल.
गडचिरोली जिल्हा चॅलेंज म्हणून घेता तसा बीड जिल्हा चॅलेंज म्हणून घ्या. गुन्हेगारीचा पॅटर्न आमच्या जिल्ह्यात वाढत आहे, त्यावर आळा घाला, असे संदीप क्षीरसागर म्हणाले.