आरोपींना फाशीची शिक्षा द्या: आ. नमिता मुंदडा

आरोपींना फाशीची शिक्षा द्या: नमिता मुंदडा

केजच्या भाजप आमदार नमिता मुंदडा यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संतोष देशमुख हे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावाचे दोन वेळा सरपंच होते. हे प्रकरण माझ्या मतदारसंघातील आहे, असे नमिता मुंदडा म्हणाल्या. देशमुख यांनी चांगले काम केले होते. लोकप्रतिनिधी असून त्यांचे राष्ट्रीय महामार्गावर अपहरण करण्यात आले. अवघ्या दोन-तीन तासांत त्यांचा मृतदेह रस्त्यावर फेकण्यात आला. त्यांचे डोळे जाळण्यात आले आणि पकडून मारण्यात आले, असे नमिता मुंदडा म्हणाल्या.

“९ डिसेंबरला हत्या झाली आणि आज १७ डिसेंबर आहे. ८ दिवस झाले, ७ आरोपींपैकी ३ आरोपी सापडले आहेत. ज्याने हत्या केली तो मुख्य आरोपी सापडलेला नाही, तो फरार आहे. अध्यक्षमहोदय, सगळ्या आरोपींना पकडून फाशीची शिक्षा देण्यात यावी. जिल्ह्यात लोक घाबरले आहेत, जिल्हा बंद केलेला होता. सगळ्या ७ आरोपींना पकडून फाशीची शिक्षा द्या,” अशी मागणी नमिता मुंदडा यांनी केली.

error: Content is protected !!