भाजप नेते आणि महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची माफी मागितली आहे. “मी रामदास आठवले यांची माफी मागतो. मंत्रिमंडळ विस्ताराचे निमंत्रण त्यांना वेळेत पोहोचले नाही. आमच्याकडून चूक झाली आहे,” असे बावनकुळे पुण्यात बोलताना म्हणाले.
बावनकुळे म्हणाले, “मंत्रिमंडळात कोणाला घ्यायचे आणि कोणाला नाही, हा मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे. छगन भुजबळ यांना भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुती चांगले स्थान देईल. सुधीर मुनगंटीवार आणि इतर नेत्यांची मंत्रीपदावरून कोणतीही नाराजी नाही. राष्ट्रवादी आणि शिवसेना त्यांच्या पक्षातील नाराजांची नक्कीच समजूत काढतील. घराणेशाहीचा आरोप योग्य नाही. ज्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे, ते त्यांच्या कर्तृत्वाने मिळाले आहे, घराणेशाहीमुळे नाही,” असेही बावनकुळे यांनी नमूद केले.