फडणवीसांची लाडकी बहीण मंत्रिमंडळात; पंकजा मुंडेंना मिळणार गिफ्ट?

राज्यात विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकून आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. मात्र यावेळी भाजपने महायुती या घटक पक्षांतर्गत विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यामुळे राज्यात महायुतीची पुन्हा एकदा सत्ता आली आहे. महायुतीला लाडक्या बहिणींनी भरभरून मतदान केल्याचा फायदा झाला आहे. त्यामुळे भाजपाच्या महिला नेत्या पंकजा मुंडे यांना मंत्री करून लाडक्या बहिणीला गिफ्ट देणार का हे बघण्यासारखं राहणार आहे.

विधानसभा निवडणुकीमध्ये महिलांच्या वाढलेल्या मतदानामुळे भाजपला मोठा फायदा झाला आहे. बीडमध्ये भाजप पिछाडीवर आहे, फक्त २ आमदार भाजपचे आहेत, जे कधी काळी ५ होते. पंकजा मुंडे यांचा राजकीय वनवास भरून काढण हेच त्यांच्यासाठी मोठं गिफ्ट असणार आहे.

पंकजा मुंडे यांची मंत्रीपदासाठी संधी: फडणवीस यांच्यासोबत चर्चा

मागील १० वर्षांपासून स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या भाजपामध्ये दिलेल्या राजकीय योगदानामुळे पंकजा मुंडे आणि प्रितम मुंडे यांना भाजपाने उमेदवारी देत निवडून आणण्यात मदत केली. मात्र २०२४ लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे आणि खासदार प्रितम मुंडे यांच्यातच भाकरी बदलवली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे पराभूत झाल्या. तर विधानसभा निवडणुकीला धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे दोघेही भाऊ-बहिण एकत्र आल्याचे दिसले. त्यामुळे धनंजय मुंडे यांचा विजय सोपा झाला.

राज्यात भाजपाच्या नेतृत्वाखालील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महायुतीचे सरकार आल्यानंतर एकेकाळचे राजकीय प्रतिस्पर्धी असलेले फडणवीस-पंकजा मुंडे यांच्यात अखेर समेट झाला. त्यानंतर राज्याच्या मंत्रिमंडळात २०१४ च्या धर्तीवर पुन्हा एकदा मंत्री पदाची संधी मिळण्याची शक्यता पंकजा मुंडे यांना वाटत आहे. मात्र यावेळी मराठवाड्याच्या विकासासाठी आणि स्थलांतरित कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

error: Content is protected !!