जातीय तेढ निर्माण करण्याचा तसेच या दुर्दैवी घटनेच्या आडून राजकारण साधण्याचा प्रयत्न-धनंजय मुंडे

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा: धनंजय मुंडे

बीड, दि. ९ (प्रतिनिधी): बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली होती. संतोष देशमुख यांच्या हत्येने जिल्ह्यात खळबळ उडाली असून ग्रामस्थांनी आंदोलन करत आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी आंदोलन केले होते. या घटनेवर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

गंभीर स्वरूपाचे प्रकरण

मस्साजोग येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर स्वरूपाचे आहे. या स्वरूपाची गुन्हेगारी समाज विघातक असून अशा वृत्तीला वेळीच ठेचले गेले पाहिजे. यासाठी या प्रकरणातील सर्व आरोपींना कठोर शासन केले जावे, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली आहे.



फास्ट ट्रॅक कोर्टाची मागणी

धनंजय मुंडे यांनी देशमुख कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवले जावे, अशी मागणी केली आहे. गुन्हेगारी ही एक अपप्रवृत्ती आहे, तिला जात नसते, मात्र या प्रकरणाचा अडून काही जण जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करून जातीय तेढ निर्माण करण्याचा तसेच या दुर्दैवी घटनेच्या आडून राजकारण साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.

आरोपींना तात्काळ अटक

संतोष देशमुख हत्येच्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक केली जावी तसेच हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवले जावे, या संदर्भात धनंजय मुंडे यांनी एक पत्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनाही दिले आह

पवनचक्कीच्या वादातून हत्या

पवनचक्कीच्या संदर्भातील कामाच्या वादातून ही हत्या झाल्याचे समजते, मात्र जाणीवपूर्वक याआडून बीड जिल्ह्याची बदनामी केली जात आहे. पोलीस यंत्रणा, तपास यंत्रणा तसेच न्यायव्यवस्था या माध्यमातून संतोष देशमुख यांना नक्कीच न्याय मिळेल, कुणीही नाहक जिल्ह्याची बदनामी करू नये, असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी यावेळी बोलताना केले आहे.

मस्साजोग प्रकरणी पंकजा मुंडेंकडून हळहळ व्यक्त


मस्साजोगमधील सरपंचाचे अपहरण करून ठार करण्यात आलं. ही घटना अत्यंत दुर्देवी आहे. याविषयी मी संताप व्यक्त करते. मी शोक व्यक्त करते. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात मी आणि माझा परिवार सहभागी असून, त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. असं पंकजा मुंडे यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी शोक व्यक्त केला.

error: Content is protected !!