राहुल राऊत यांचा जिल्हा कोषागार अधिकाऱ्यांनी केला

बिकट परिस्थितीत मिळविले उज्वल यश;
राहुल राऊत यांचा जिल्हा कोषागार अधिकाऱ्यांनी केला सत्कार

बीड दि.11 (प्रतिनिधी):
बिकट बिकट परिस्थिती असतानाही राहुल आणि उद्धव राऊत यांनी चांगले शिक्षण घेऊन उद्धव पोलीस खात्यात तर दुसऱ्याने जिल्हा न्यायालयामध्ये नोकरी मिळाली. राहुल राऊत यांच्या उज्वल यशाबद्दल, जिल्हा कोषागार अधिकारी लहुजी गळगुंडे आणि त्यांच्या लेखाधिकारी सहकाऱ्यांनी राऊत यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
वशिष्ठ राऊत हे कवडगाव येथील रहिवासी यांना दोन मुले आहेत. मोठा मुलगा राहुल व धाकटा मुलगा उद्धव घरची अत्यंत बिकट परिस्थिती. अक्षरशः दुसऱ्याकडे सालाने राहुन दोन्हीही मुलांचे उच्च शिक्षण केले. धाकटा मुलगा उद्धव सध्या पोलीस भरतीमध्ये बीड येथे रुजू झाला. तर मोठा मुलगा राहुल यांनी एलएलबी शिक्षण पूर्ण केले. राहुलने मराठी व इंग्रजी दोन्हीही स्टेनो केले आहे. सातारा न्यायालयामध्ये त्याची स्टेनोपदावर निवड झाली आहे. घरची परिस्थिती बिकट असतानाही त्यांनी घेतलेले शिक्षण व सुसंस्कार हे त्यांच्या यशाची पावती आहे.
बुधवार दि. 11 डिसेंबर 2024 रोजी जिल्हा कोषागार अधिकारी लहुजी गळगुंडे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी संजय नरहरराव कुलकर्णी, लेखा अधिकारी व श्रीकांत कुलकर्णी लेखाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांनी राहुल राऊत यांचा सत्कार करून त्यांच्याशी संवाद साधला. या शुभेच्छेची शिदोरी घेऊन आम्ही पुढील यशस्वी मार्गक्रमण करू, असे राहुल यांनी संवादाच्या वेळी मनोगत व्यक्त केले.

error: Content is protected !!