बडे यांनी जिल्हा बालविकास अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला
बीड दि.3 (प्रतिनिधी):
बीड जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर केकान यांचा दि. 2 डिसेंबर रोजी प्रतिनियुक्तीचा कालावधी संपल्यामुळे राज्य शासनाच्या आदेशानुसार कार्यमुक्त करण्यात आले आहे. दरम्यान जिल्हा बालविकास अधिकारी या पदाचा प्रभारी कार्यभार का.आ.बडे यांच्याकडे देण्यात आला आहे.
बडे हे परळी तालुका बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत आहे. बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवने यांनी बडे यांच्याकडे प्रभारी पदाचा कार्यभार सोपविला आहे.