एकनाथ शिंदे कदाचित उपमुख्यमंत्रिपदही स्वीकारणार नाहीत – संजय शिरसाट 

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्याच्या नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार नाहीत, याबाबतची माहिती शिंदेंचे निकटवर्तीय असलेले आमदार संजय शिरसाट यांनी गुरुवारी दिली आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे, असं शिवसेनेचे आमदार आणि प्रवक्ते संजय शिरसाट म्हणाले आहेत. 

एकनाथ शिंदे कदाचित उपमुख्यमंत्री बनणार नाहीत. मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीने पुन्हा उपमुख्यमंत्रिपदावर जाणे योग्य नाही. शिवसेना दुसऱ्या नेत्याला उपमुख्यमंत्री करण्यास सांगेल, असेही शिरसाट म्हणाले. शिरसाट पुढे बोलताना म्हणाले, एकनाथ शिंदे यांना सोडून शिवसेनेतील इतर कोणत्याही नेत्याला उपमुख्यमंत्रिपदाची संधी देण्यात येईल.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या दणदणीत विजयानंतर मुख्यमंत्री कोण होणार याबाबत साशंकता आहे. भाजप नेत्यांचा निर्णय मान्य करणार असल्याचे शिंदे यांनी बुधवारी सांगितले होते. सरकार स्थापनेत ते अडसर बनणार नाहीत, असेही एकनाथ शिंदे म्हणाले. मुख्यमंत्रिपदाची मागणी करणार नसल्याचे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात निवडणूक लढलेल्या महायुतीने निर्विवाद वर्चस्व मिळवलं. महायुतीने 288 पैकी 236 जागा जिंकून ही निवडणूक एकतर्फी जिंकली. गेल्या दोन दिवसांपासून मुख्यमंत्रिपदावरुन सुरु असलेला सस्पेन्स आज जवळपास दूर झालाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गेल्या अडीच वर्षात आमच्या सरकार पाठबळ दिलं. मी आता सरकार स्थापन कोणतीही अडचण येऊ देणार नाही. मोदी-शाह मुख्यमंत्रि‍पदाबाबत जो निर्णय घेतील, तो मला मान्य असल्याचे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असं बोललं जात आहे.

error: Content is protected !!