केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) यांची काल रात्री दिल्लीत भेट झाली. महाराष्ट्रातील मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाह यांनी विनोद तावडे यांना बोलावून घेतले होते. यावेळी मराठा चेहरा नसल्यास होणाऱ्या परिणामांविषयी अमित शाह यांनी विनोद तावडे यांच्यासोबच चर्चा केल्याची सूत्रांनी माहिती आहे.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी कोण असणार? याबाबत राजधानी दिल्लीत खलबतं सुरु आहेत. भाजपचे नेते विनोद तावडे आणि अमित शाह यांच्यात काल दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा झाली. राज्याच्या मुख्यमंत्रिपदी मराठा चेहरा नसल्यास, त्याचे काय परिणाम होतील? यावर दोघांमध्ये चर्चा झाली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी कोण असणार? याची चर्चा होत आहे. निकाल लागून पाच दिवस झालेत मात्र अद्यापपर्यंत सत्तास्थापनेचा दावा करण्यात आलेला नाही. त्यामुळे नवं सरकार कधी अस्तित्वात येणार? हा प्रश्न वारंवार विचारला जात आहे.
अमित शाह आणि विनोद तावडे यांच्यात महाराष्ट्र, मुख्यमंत्री आणि मराठा या समीकरणावर चर्चा झाली. अमित शाह यांनी विनोद तावडेंकडून महाराष्ट्रातील मराठी समाजाची समीकरणं समजून घेतली. देवेंद्र फडणवीस यांची राज्यात पुन्हा मुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाल्यास मराठा मते कशी टिकवता येतील, यावर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्रात बिगर मराठा मुख्यमंत्री केल्यास मराठा समाजाची मतांवर किती परिणाम होऊ शकतो याची बेरीजवजाबाकी करण्यात आली. मराठा चेहऱ्याऐवजी दुसरा चेहरा दिला तर मराठा मतं दुखावण्याची चिंता केंद्रीय नेतृत्वाला आहे.
मराठा मत दुखावणार नाही याची चिंता केंद्री नेतृत्वाला आहे पण ओबीसी मत दुखणार का याची चिंता त्यांना अजिबात दिसत नाही आहे. विनोद तावडे यांचा विचार या भेटीमार्फत असण्याची शक्यता आहे