आमदार होताच संदीप क्षीरसागर यांनी घेतली जरांगे पाटलांची भेट

संदीप क्षीरसागर ठरले पुन्हा मुकद्दर का सिकंदर

बीड, दि.२३ (प्रतिनिधी): बीड विधानसभा मतदारसंघात आमदार संदीप क्षीरसागर यांच्या विरोधात त्यांचे सगळे विरोधक एकवटले होते. तरी देखील त्याचा काहीही परिणाम न होता पुन्हा विजयाचा गुलाल बिडकारांनी संदीप क्षीरसागर यांच्यावरच उधळला. संदीप क्षीरसागर आणि नशीब हे एक समीकरण बनलेले आहे. कारण ज्या ज्या वेळी संदीप क्षीरसागर निवडणुकीच्या मैदानात उतरतात, त्या वेळी त्यांना गुलालच लागलेला आहे.

२०१७ मध्ये काकू नाना विकास आघाडीची स्थापना करून पहिल्यांदाच काकांचे विरोधात पुतण्या संदीप क्षीरसागर नगरपालिकेच्या निवडणुकीत उतरले होते. या पहिल्याच निवडणुकीत जवळपास २० नगरसेवक स्वबळावर संदीप क्षीरसागर यांनी निवडून आणले.

आमदार होताच संदीप क्षीरसागर यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी आगामी काळातील विकासकामांवर चर्चा केली. संदीप क्षीरसागर यांनी आपल्या विजयाचे श्रेय जनतेला दिले आहे आणि त्यांच्या विश्वासाला पात्र ठरण्याचे आश्वासन दिले आहे.

संदीप क्षीरसागर यांच्या या विजयामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या पुढील कार्यकाळात जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ते कसे प्रयत्नशील राहतील, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

संदीप क्षीरसागर यांच्या या दणदणीत विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन आणि पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा!

error: Content is protected !!