बीड, दि. २३ (प्रतिनिधी): राज्यभरात महायुतीचा गाजावाजा असून बीड जिल्ह्यात सहा पैकी महायुतीला पाच जागा मिळाल्या आहेत. मात्र बीड मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर पाच हजाराहून अधिक मतांनी विजयी झाले आहेत, तर परळीतून धनंजय मुंडे यांनी राज्यात सर्वाधिक मताधिक्य मिळविले आहे.
बीड जिल्ह्यात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये थेट लढत झाली. बीड मतदारसंघाकडे सर्व राज्याचे लक्ष लागले होते, मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार आ. संदीप क्षीरसागर हे पाच हजाराहून अधिक मतांनी विजयी झाले.
महायुतीचे पाच उमेदवार विजयी झाले आहेत:
- गेवराईमधून विजयसिंह पंडित
- माजलगाव मधून प्रकाश सोळंके
- परळीमधून धनंजय मुंडे
- केजमधून नमिता मुंदडा
- आष्टीमधून सुरेश धस
महाविकास आघाडी कडून संदीप क्षीरसागर हे एकमेव उमेदवार विजयी झालेले आहेत.
या विजयामुळे बीड जिल्ह्यात महायुतीची पकड अधिक मजबूत झाली आहे. धनंजय मुंडे यांच्या विजयामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे
या निवडणुकीत बीड जिल्ह्यातील मतदारांनी महायुतीला मोठा पाठिंबा दिला आहे. आगामी काळात महायुतीच्या उमेदवारांकडून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कसे प्रयत्नशील राहतील, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.