Maharashtra Vidhansabha Election Result 2024 मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठीचा (Vidhansabha) निकाल हाती येत असून नात्यागोत्यांच्या आणि भाऊबंदकीच्या लढतींकडे राज्याचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघातून भाऊ-भाऊ आणि बहिण भाऊ निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे, भावा जिंकलास का, असा सवाल करत या भावांच्या लढतींकडे मतदारसंघातील आणि आजुबाजूच्या मतदारसंघातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. त्यामध्ये, राजकारणातील मोठे घराणे आणि राजकीय पक्षांचे प्रमुख असलेल्या पवार, ठाकरे, कुटुंबातीलही सदस्य मैदानात उतरले आहेत. मुंबईतून दोन ठाकरे मैदानात असून अमित ठाकरे माहीम मतदारसंघातून यंदा प्रथमच निवडणूक लढवत आहेत. तर, शिवसेना युबीटी आमदार आदित्य ठाकरे हे दुसऱ्यांदा वरळीतून (Worli) निवडणूक लढवत आहेत. यांसह, राज्यातील अनेक मतदारसंघात अशा लढती होत असून या लढतींकमध्ये कोणी बाजी मारली
प्रमुख लढती
1. बारामती – अजित पवार Vs युगेंद्र पवार
2. मुंबई – ठाकरे बंधू
3. मुंबई – शेलार बंधू भाजपकडून मैदानात
4. कोकण – राणे बंधुही मैदानात
5.लातूर – देशमुख बंधू
6. संभाजीनगर – दानवे बहीण-भाऊ
7. बीड – संदीप क्षीरसागर Vs डॉ.योगेश क्षीरसागर
8. जळगाव – किशोर पाटील Vs वैशाली सूर्यवंशी