क्षीरसागर मुक्त बीड साठी एकत्र या चिठ्ठी टाका ज्योतीताई मेटे, अनिल जगताप यांना कुंडलिक खांडे यांचे महत्त्वाचे आवाहन

बीड, दि. 18: “क्षीरसागर मुक्त बीड” हे स्वप्न साकार करण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात आहे. या उद्देशाने मीही पुढाकार घेतला असून, अपक्ष उमेदवार डॉ. ज्योतीताई मेटे आणि अनिल जगताप यांनी एकत्र येऊन आज पत्रकार परिषद घ्यावी, असे आवाहन कुंडलिक खांडे यांनी केले आहे.

सर्व उमेदवारांनी एकमताने निर्णय घेण्यासाठी चिठ्ठी पद्धतीचा अवलंब करावा. चिठ्ठीतून ज्या व्यक्तीचे नाव समोर येईल, त्या उमेदवाराच्या पाठीशी एकजुटीने उभे राहून त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. यामुळेच खऱ्या अर्थाने बीड क्षीरसागर मुक्त होईल, असे खांडे यांनी नमूद केले.

कुंडलिक खांडे यांच्या या आवाहनाला ज्योतीताई मेटे आणि अनिल जगताप कसा प्रतिसाद देतात, याकडे बीड मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.

या प्रसंगी छत्रपती संभाजी महाराज, दीपक केदार, गेवराई मतदारसंघाच्या उमेदवार पूजा मोरे आणि रामहरी मेटे यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

error: Content is protected !!