बीड दि.9 (प्रतिनिधी):
शहरातील आंबेडकर नगर चौकात दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सिमेंट ट्रकचा खाली पडल्याने डोक्यावरून ट्रक गेल्याने पोलीस ठाण्याचे जमादार सुनील घोळवे वय 50) यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
जमादार सुनील घोळवे हे शिवाजीनगर पोलीस ठाण्याला कार्यरत होते. शासकीय कामानिमित्त गणवेशात ते अंबिका चौकातून जात असताना एका सिमेंटच्या ट्रकचा धक्का लागल्याने ट्रक खाली पडले. डोक्यावरून ट्रॅकचे चाक गेल्याने संपूर्ण डोक्याचा आणि छातीचा चेंदामेंदा झाला
सदर वृत्त समजतात बीड जिल्हा रुग्णालयात पोलीस कर्मचारी नागरिकांनी नातेवाईकांची मोठी गर्दी झाली होती.