बीड दि.(प्रतिनिधी):
शहरातील सुभाष रोडवर असलेल्या बीड शहर पोलीस ठाण्याचे पूर्वी असलेल्या जुन्या जागेतील नव्या इमारतीमध्ये कसलाही प्रकारचा गाजावाजांना करता अचानक मंगळवार दि.6 रोजी मंगळवारी दुपारनंतर पोलीस ठाण्यातील सर्व फर्निचर आणि दप्तर नव्या इमारतीमध्ये हलविण्यासाठीची कार्यवाही उशिरा रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
राज्य शासनाने सुमारे 75 नव्या इमारती बांधण्यास बांधल्या आहेत. त्यातील त्यामध्ये बीड शहर पोलीस ठाण्याच्या इमारत असा मेसेज असून गेल्या काही महिन्यापूर्वी सदर इमारत बांधून पूर्ण झाली होती. आचार संहिता कालावधीमुळे सदर इमारतीचे उद्घाटन करता आले नाही.
बीड शहर पोलीस ठाण्याची इमारत ही अत्यंत अद्यावत आणि कार्पोरेट पद्धतीची बांधण्यात आलेली आहे. प्रशस्त खोल्या, कॉन्फरन्स हॉल, स्वच्छतागृह आदींची द्यावत सुविधा आहेत.