बीड दि.5 (प्रतिनिधी):
पूर्वीच्या भांडणाचा मनात राग धरून दि.20 एप्रिल रोजी भजनाच्या कार्यक्रमात येऊन जबर मारहाण प्रकरणातील आरोपींना बीड येथील न्यायालयाने जामीन फेटाळला आहे. सदर प्रकरणातील आरोपींना अटक करून संबंधित त्याविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात माहिती अशी की, दि. 20 एप्रिल 2024 रोजी रात्री सुमारे अकरा वाजण्यास सुमारात गावात सुरू असलेल्या भजनाच्या कार्यक्रमात येऊन वाघ कुटुंबावर हल्ल्यात केल्याप्रकरणी गणेश शंकर आघाव, जगन्नाथ नागरगोजे, आसाराम सोनाजी आघाव, मंगेश आसाराम आघाव, निलेश आसाराम आघाव, गोरक्ष जगन्नाथ आघाव, विठ्ठल प्रल्हाद बारगजे, शंकर महादेव आघाव, हरिहर मुरलीधर बांगर, विवेक एकनाथ बारगजे, शंकर महादेव आघाव आदी तेरा जणांनी भजनाच्या कार्यक्रमात येऊन मारहाण केली होती. सदर प्रकरणी चकलांबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी जामिण्यासाठी आरोपींनी बीड जिल्हा न्यायालयात वकीलपत्र दाखल केले होते. मात्र या प्रकरणी न्यायालयाने जमीन फेटाळला आहे.
या प्रकरणातील आरोपी हे सहा महिन्यापासून फरार आहेत. आरोपीकडून गावात दहशत पसरवण्याचा प्रयत्न असून जाणीवपपुर्वक गुंडागर्दी करत आहेत. सदर प्रकरणात संबंधितांना अटक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे