केज: फर्निचर व्यावसायिकाची दोन लाखांची रोकड चोरीला गेली

केज: केज येथील एका फर्निचर दुकानासमोर उभी असलेल्या व्यवसायिकाची कारमधून दोन लाख रुपये रोख असलेली बॅग चोरट्याने पळवली आहे. ही घटना मंगळवारी, २२ ऑक्टोबर रोजी रात्री ८:०० वाजता घडली.

पोलिसांच्या माहितीनुसार, प्रशांत प्रदिप नेहरकर हे फर्निचरचे व्यवसायिक आहेत. ते आपले दुकान बंद करून कार उभी करून दुकानात गेले होते. यावेळी त्यांनी कारमध्ये दोन लाख रुपये रोख असलेली बॅग ठेवली होती. मात्र, कार लॉक न केल्यामुळे अज्ञात चोरट्याने संधी साधून ही बॅग पळवली.

याप्रकरणी बुधवारी, २४ ऑक्टोबर रोजी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याचा शोध सुरू केला आहे.

error: Content is protected !!