प्रा.लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ला प्रकरणीकारवाईसाठी पोलीस अधीक्षकांना निवेदन

बीड दि.5 (प्रतिनिधी):
ओबीसी नेते प्रा.लक्ष्मण हाके सर यांना पाठबळ देण्यासाठी शुक्रवारी बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदनाद्वारे प्रा.हाके यांना संरक्षण देण्यात यावे, मागणी करण्यात आली आहे.
बहुजन,ओबीसी, दलित,दिन दुबळे तथा वंचितांचा लढा उभारणारे संघर्षयोद्धा प्रा.लक्ष्मण हाके यांच्यावर दि.30 सप्टेंबर 2024 रोजी पुण्यात झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा विनाकारण सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्रोल करून केलेल्या बदनामीच्या कटाचा निषेधार्थ बैठक घेण्यात आली. या बैठकीत अशा समाज कंटकावर कडक कारवाई करण्यात यावी, यासाठी शुक्रवार दि.4 रोजी पोलीस अधीक्षक बीड यांना रितसर निवेदन देण्यात आले. यावेळी बीड पोलीस अधीक्षक यांनी सकारात्मक उत्तर दिले. कारवाई न झाल्यास सर्व सकल ओबीसी समाज यांना विचारात घेऊन पुढील दिशा ठरवली जाईल. असा एकमताने जाहीर करण्यात आले. यावेळी ओबीसी नेते व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!