के.एस.के.महाविद्यालयात 10 ऑक्टोंबरला
आविष्कार महोत्सवाचे आयोजन
बीड(प्रतिनिधी)ः डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा तर्फे जिल्हास्तरीय आविष्कार महोत्साचे आयोजन 10 ऑक्टोंबर रोजी सौ.के.एस.के.महाविद्यालयात करण्यात आले आहे. यात जास्तीत जास्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभााग व्हावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवानंद क्षीरसागर,उपप्राचार्य डॉ.संजय पाटील देवळाणकर, पदव्युत्तर संचालक डॉ.ए.एस.खान, उपप्राचार्य डॉ.नारायण काकडे, पर्यवेक्षक जालिंदर कोळेकर, जिल्हा समन्वयक डॉ.ए.के.डोंगरे यांनी केले आहे.
जानेवारी 2025 मध्ये राज्यस्तरीय आविष्कार महोत्स्व लोणेरे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात होणार आहे. त्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या तयारीसाठी जिल्हास्तरीय आविष्कार महोत्सव घेण्यात येत आहे. त्यानुसार बीड जिल्हयाचा महोत्सव सौ.के.एस.के.महाविद्यालयात दिनांक 10 ऑक्टोबर रोजी होणार आहे. यात सहभागी होणार्या महाविद्यालयानी आपल्या विद्यार्थ्यांची नावे दिनांक 5 ऑक्टोंबर पर्यंत नोंदवावीत.
मानव्यविद्या भाषा आणि ललित कला, वाणिज्य व्यवस्थापन व विधी , विज्ञान, कृषी व पशुसंवर्धन, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान आणि औषध निर्माणशास्त्र अशा सहा गटात पदवी , पदव्युत्तर, पदव्युनंतरची पदवी अशा तीन स्तरावर होणार