बीड बायपासवर झालेल्या अपघांतांची न्यायालयाकडून गंभीर दखल

डिसेंबर २०२४ पर्यंत  स्लीप सर्विस रोड आणि उड्डाणपूलांना मंजुरी देण्याचे न्यायालयाकडून निर्देश 

आ.संंदीप क्षीरसागर, माजी आ.सय्यद सलीम यांच्या प्रयत्नांना यश

बीड दि.२ (प्रतिनिधी):- बीड बायपासवर दिवसेंदिवस होत असलेले अपघात आणि जाणारे जीव यांची दखल आता मा.उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने घेतली असून यासंदर्भातील आ.संदीप क्षीरसागर व माजी आ.सय्यद सलीम यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने निर्णय दिला असून, डिसेंबर २०२४ पर्यंत १२ कि.मी. अंतर असलेल्या बीड शहराच्या लगत असलेल्या बायपासवर छत्रपती संभाजी महाराज चौक व महालक्ष्मी चौक येथे उड्डाणपूल तसेच इमामपूर रोड, माजलगाव रोड, परळी रोड या ठिकाणांवर स्लीप सर्विस रोड मंजूर करण्याचे निर्देश मा.उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ यांनी एराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिले आहेत.

                   राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून औरंगाबाद-येडशी महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचे काम २०१५ साली सुरू करण्यात आले होते. याच कामांतर्गत महामार्गावर बीड शहराच्या पूर्व बाजूने १२ कि.मी. अंतराचा बायपास म्हणजेच बाह्यवळण रस्ता तयार करण्यात आला. परंतु हा बायपास तयार करताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने इंडियन रोड काँग्रेसच्या (IRC) गाईड लाइन्स प्रमाणे काम केले नाही. इंडियन रोड काँग्रेसच्या (IRC) च्या गाईड लाइन्स नुसार बायपासला क्रॉस होणार्‍या राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, जिल्हा मार्ग याठिकाणी स्लीप सर्विस रोड करणे आवश्यक आहे. परंतु बीड बायपासवर बीड-परळी रोड हा राष्ट्रीय महामार्ग, बीड-माजलगाव हा राज्य महामार्ग व बीड-इमामपूर हा प्रमुख जिल्हा मार्ग असे तीन महत्वाचे रस्ते क्रॉस होतात. तसेच बीड शहरात महामार्गावरून प्रवेश करताना असलेले छत्रपती संभाजी महाराज चौक व महालक्ष्मी चौक या दोन्ही ठिकाणी उड्डाणपूल करण्यात आलेला नाही. ही बाब अत्यंत गंभीर आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने याठिकाणी आवश्यक असलेल्या बाबींचे पालन न केल्यामुळे आत्तापर्यंत दोन्ही चौकांमध्ये एकूण १३ लोकांचा बळी गेल्याची नोंद आहे. तर दरदिवस अपघात होऊन असंख्य लोक जखमी होत आहेत. 

error: Content is protected !!