प्रतिनिधी (सिल्लोड)राज्य भरात जिल्हा परिषद शाळेत पवित्र पोर्टल मार्फत शिक्षकांची भरती करण्यात आली आहे. शिक्षकांना सुरवातीच्या तिन वर्षासाठी शिक्षणसेवक म्हणून रुजू करण्यात येते.तिनवर्ष पुर्ण झाल्यावर सहशिक्षक म्हणून नियुक्ती देण्यात येते.
शिक्षणसेवक पदावर कार्य करतांना ठराविक मानधन 16000 रुपये देण्यात येते.ह्या संदर्भात सिल्लोड येथील शिक्षण सेवकांनी पालकमंत्री ना. अब्दुल सत्तार यांना निवेदन दिले आहे कि शिक्षणसेवक पद रद्द करून त्यांना शिक्षक म्हणून नियुक्ती देण्यात यावी अशी मागणी केली आहे. 2024 मध्ये नियुक्त शिक्षण सेवक हे शिक्षक भरती होत नसल्याने जवळपास 35 वर्षाचे आहे. त्यांना सरासरी 23 वर्ष सेवाकाल भेटणार असुन त्यातही तिन वर्ष शिक्षणसेवक म्हणून कार्य करणार आहेत. ह्यामुळे तिन वेतनवाढ चे नुकसान होते. तसेच 16000 एवढ्या मानधन मध्ये घर चालवणे खुप अवघड आहे कारण जवळपास सगळेच शिक्षणसेवक ईतर जिल्ह्यातील आहे. जेव्हा शिक्षण सेवक हे पद अस्तित्वात आणल्या गेले होते तेव्हा स्पर्धा व महागाई नव्हती.नवीन शैक्षणिक धोरण मध्ये शिक्षणसेवक पद नाही. हि अन्यायकारक नियम आहे म्हणून शिक्षण सेवक पद रद्द करण्यात यावे अशी मागणी अंकुश रौंदळे,आनंद खरात,सोमनाथ घोडके,पवन मंडळकर ,श्रीकृष्ण ढगे,स्वप्नील सरकटे,विजय सरकटे,मंगेश गेडाम,निता मडावी,कृष्णा मख, शिवा सोनवणे, सिमा मॅडम,डी.टी पाटील,योगेश नवाळे, योगेश दंडायत यांनी कली आहे.
पालकमंत्री यांनी शासन स्तरावर मुद्दा मांडण्याचे आश्वासन दिले. नवनियुक्त शिक्षण सेवकांचे म्हणणे त्यांनी समजून घेऊन त्यांनी लगेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पत्र तयार करून त्यांना देण्याचे आश्वासन दिले.