वाळु माफियांच्या पायाकडून आली, कलेक्टरांच्या गाडीला कट मारला.
बीड (रिपोर्टर) बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुंडे (collecter dipa munde) या औरंगाबादहून बीडकडे येत असताना मध्यरात्री विना नंबरच्या वाळुच्या टिप्परने कलेक्टरांच्या गाडीला कट मारला आणि टिप्पर पसार झाले. या दरम्यान कलेक्टरांच्या गाडीने वाळुच्या गाडीचा पाठलाग केल्याचे समजते. सदरची घटना अत्यंत गंभीर असून या प्रकरणी कलेक्टरांनी थेट एसपींना भ्रमणध्वनीवरून घटनेची माहिती दिली. गुन्हे अन्वेषण विभागासह गेवराई पोलीस संबंधित टिप्परचा शोध मादळमोही हिंगणी हवेलीसह परिसरामध्ये घेत आहेत.
अधिक माहितीनुसार, बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ dipa munde ias या त्यांच्या शासकीय कार (एमएच 23-बीसी 7585) मध्ये छत्रपती संभाजीनगरहून बीडला येत होत्या. यावेळी त्यांचा बॉडीगार्ड सोबत होता. गुरुवारी पहाटेच्या सुमारास गेवराई तालुक्यातील पाडळशिंगी येथे त्यांची कार आली असता एकाविना क्रमांकाच्या टिप्परने मुधोळ यांच्या कारला कट मारला. त्यानंतर पुढे गेल्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या बॉडीगार्डने टिप्परला थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु चालकाने टिप्पर थांबवला नाही. तर मुख्य मार्गावरून गावातील रस्त्यावर टिप्पर घातले व काही अंतरावर जाऊन वाळू रस्त्यावर टाकून पळून गेला. हा प्रकार जिल्हाधिकारी मुधोळ यांनी तत्काळ जिल्हा पोलिस अधीक्षकांना कळविला. त्यानंतर पोलिस यंत्रणा तत्काळ कामाला लागली व टिप्पर चालकास ताब्यात घेण्यात आले आहे. बीड जिल्ह्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असल्याने मुधोळ यांनी काही दिवसांपूर्वी कारवाया केल्या होत्या. त्यामुळेच हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त होत आहे.
नेमकं काय घडलं, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम…
जिल्हाधिकारी मुधोळ या छत्रपती संभाजीनगर येथून बीडला येत असताना पाडळसिंगीजवळ त्यांना एक विना क्रमांकाचा टिप्पर दिसला. त्यामुळे त्यांनी त्याचा पाठलाग केला. त्यानंतर त्यांचा सुरक्षारक्षक पोलिस कर्मचारी खाली उतरून चालकाच्या बाजूने लटकले. वाहन थांबविण्यासाठी चालकाला सांगत होते. परंतु तो भीतीपोटी ट्रक चालक पळून गेला. दूरवर जाऊन त्याने वाळू खाली केली आणि तो फरार झाला. याबाबत जिल्हाधिकारी मुधोळ यांनी पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना कॉल केला. तर जिल्हाधिकारी यांचा फोन येताच बीड, गेवराई आणि विशेष शाखेच्या पोलिसांना पोलीस अधीक्षक यांनी तपासाचे आदेश दिले, त्याप्रमाणे एलसीबीने टिप्पर ताब्यात घेऊन चालकालाही अटक केली आहे. चालकाविरोधात कलम 307 प्रमाणे गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असा घटनाक्रम पोलीस अधीक्षक यांनी माध्यमांना सांगितला आहे. तर वाळू माफियांची ही दादागिरी सहन केली जाणार नाही. या प्रकरणातच नव्हे, तर आता अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असेही पोलिस अधीक्षक म्हणाले.