जाणून घ्या काय आहे कारण
Hotels, shops will be closed after 10 pm in Beed
जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था यासंदर्भात नियमित आठवड्याला आणि महिन्याला पोलीस अधीक्षक कार्यालयात बैठक होत असते आणि मंगळवारी हि बैठक झाली यापूर्वी झालेल्या घटना पहाता आणि वृत्तपत्र सोशल माझ्या मध्ये येत असलेल्या बातम्या पहाता राज्यात याची चर्चा होत असल्याने खुद्द एसपी यांनी यावर चिंता व्यक्त केल्याची माहिती असून याच बैठकीत सर्व ठाणेप्रमुख, पोलीस प्रमुख याना सक्त ताकीद देऊन कोणताच गुन्हा घडला नाही पाहिजे प्रलंबित गुन्हे निकाली काढा असे आदेश दिले होते आणि त्यानंतर काही तासात शहरातील बशीरगंज मध्ये दोन गटात वाद झाला तो पोलिसांनी मध्यस्थिती करत अनेक कारवाई करताना शांतता निर्माण केली पण असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस अधीक्षकांनी बंधने घालताना रात्री १० नंतर दुकान ऊघडे ठेवण्यास प्रतिबंध केला आहे
बीड शहरात रात्री 10 नंतर एकही दुकान, हॉटेल अथवा इतर आस्थापना उघड्या ठेवू नयेत, असे आवाहन बीड जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
रात्री 10 नंतर पोलिसांकडून गस्त सुरू करून दुकाने बंद करण्यासंदर्भात आवाहन केले जात आहे. गेल्या 2 दिवसांपूर्वी बीड शहरात किरकोळ वादामधून जातीय वळून देण्याचा प्रयत्न केला होता.
यामुळे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या सूचनेनुसार कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून रात्री 10 नंतर जिल्ह्यातील हॉटेल, दुकाने बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जर या सूचनेचे पालन केले नाही, तर दंड अथवा थेट फौजदारी कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे. दरम्यान या निर्णयाचे काही लोकांनी स्वागत केले आहे, तर काहींनी विरोध केला आहे.
Beed, late night shopping in Beed, shops closed after 10 pm Beed, restrictions in Beed, late night restaurants in Beed, night curfew in Beed, closure of hotels in Beed, 10 pm closure of shops in Beed, 10 pm closure of hotels in Beed, late night closure of shops in Be