नवी दिल्ली | केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली आहे. आठवड्याभराच्या उपचारानंतर त्यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली आहे, संबंधित वृत्त एबीपी माझाने दिलं आहे.
गृहमंत्री अमित शहा यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली असली तरी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची दुसरी टेस्ट निगेटीव्ह आली आहे. तिसरी टेस्ट निगेटीव्ह आल्यानंतर त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे.
कोरोनाची प्राथमिक लक्षणं दिसत असल्याने आपण चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती ठीक आहे, पण डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आपण रुग्णालयात दाखल होत आहोत. माझी विनंती आहे की, गेल्या काही दिवसांमध्ये जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी स्वत:चं विलगीकरण करावं आणि आपली चाचणी करुन घ्यावी, असं अमित शहा यांनी ट्विट करून सांगितलं होतं.