सामाजिक कार्यकर्ते आसाराम सानप यांचे निधन

सामाजिक कार्यकर्ते आसाराम सानप यांचे निधन
बीड दि.21 (प्रतिनिधी):-रायमोहा येथील सामाजिक कार्यकर्ते आसाराम विठोबा सानप यांचे दि.२१ रोजी वयाच्या 95 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.
आसाराम सानप यांनी रायमोहा ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदापासून पंचायत समिती सदस्य, सोसायटीचे चेअरमन, साखर कारखान्याचे संचालक असे विविध पद भूषवले. डीसीसी बँक बीड चे संचालक वसंत सानप यांचे ते वडील होते. त्यांच्या पश्चात चार मुले, एक मुलगी,सुना, नातवंडे असा मोठा परिवार असून आसाराम सानप यांचा अंत्यविधी दिनांक 22 रोजी शनिवारी सकाळी 11 वाजता रायमोहा येथे होणार आहे. मनमिळाऊ स्वभावाचे आसाराम सानप यांच्या निधनाने रायमोहा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!