कवठे महांकाळ नगरपंचायत निवडणुकीत सर्व विरोधकांनी नामोहरम करत दिवंगत आर आर पाटील यांचे सुपुत्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते रोहित पाटील यांनी सत्ता काबीज केली.
या विजयानंतर त्यांच्यावर राज्यभरातुन कौतुकांचा वर्षाव होत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी देखील रोहित पाटील यांच्यावर कौतुकाची थाप मारली.
रोहित पवार यांनी ट्विट करत रोहित पाटील यांचे कौतुक केले. शाब्बास रोहित!! खूप खूप अभिनंदन अस म्हणत त्यांनी शाबासकी दिली.
‘पारंपारिक विरोधकांच्या भुलथापांना पाटणची जनता बळी…
विरोधकांनी माझा बाप काढला, पण आता त्यांना माझ्या वडिलांची…
राष्ट्रवादीने आमच्याशी गद्दारी करून जिल्हा मध्यवर्ती बँकेतून…
कवठे महांकाळ निवडणुकीत रोहित पाटलांचा डंका
कवठे महांकाळ येथे 13 जागांसाठी नगरपंचायत निवडणूक लागली होती. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने 10 जागांवर विजय मिळवला आहे. आर आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांच्या विरोधात सर्व विरोधक येकवटले होते. तरीही रोहित पाटील यांनी एकहाती विजय मिळवत विरोधकांना अस्मान दाखवलं.