Breaking News :राष्ट्रवादी नेत्यांवर टीका केल्यानंतर सोलापुरमध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगडफेक

सोलापूर |  भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगडफेक झाल्याची माहिती समजत आहे. सोलापूर येथील मड्डी वस्ती येथे त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने दगड केली असून त्याच्याबाबत कोंणतीही माहिती अद्याप समजू शकलेली नाही.

गोपीचंद पडळकरांनी रा़जकीय नेत्यांवर टीका केली होती. त्यानंतर त्यांच्या  गाडीवर दगडफेक झाल्यानेे भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांच्या विरोधात घोषणाबाजी केली. या दगडफेकीमध्ये कोणालाही दुखापत झाली नाही मात्र पडळकरांच्या गाडीचं नुकसान झालं आहे.

सकाळपासून सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात माझ्या बैठका सुरू आहेत. त्यानंतर मड्डी वस्ती येथील बैठकीला मी पोहोचलो. ही बैठक झाल्यावर मी गाडीत बसून निघालो होतो त्याचवेळी एका व्यक्तीने गाडीवर हल्ला केला. सोलापूर येथे माझा कुणासोबतही वाद नसल्याचं गोपीचंद पडळकरांनी म्हटलं आहे.

दरम्यान, माझा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला जातोय पण मला गोळ्या जरी घातल्या तरी मी घाबरणार नाही. गाडीच्या पुढे मोठा दगड करण्यात आला. गाडीची काच फुटली असल्याचंही पडळकर म्हणाले.

error: Content is protected !!