राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा डीएनए बहुजन विरोधी आहे – पडळकर

ओबीसींसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला इम्पिरिकल डाटा सादर करण्यास सांगितलं होतं. मात्र राज्य सरकारनं ते केलं नाही, असा आरोपही त्यांनी केला.

“राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा डीएनए बहुजन विरोधी आहे. म्हणूनच काँग्रेसच्या नेत्याच्या मुलाने ओबीसी आरक्षणाच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल केली. मी शरद पवार आणि अजित पवारांशी मुद्दयावरुन भांडतो,” असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं.

महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून मूठभर लोक बहुजनांचा आवाज दाबत आहेत. ओबीसींना दिलेले घटनात्मक अधिकार हिसकावून घेण्याचे प्रयत्न करत आहेत. ओबीसीमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला.

ओबीसी आमदारांची संख्या भाजपमध्येच सगळ्यांत जास्त असल्याचा दावाही पडळकर यांनी केला. धनंजय मुंडे किंवा अमोल कोल्हे हे का प्रदेशाध्यक्ष झाले नाहीत? हे ओबीसी नेते पुढे का आले नाहीत? असा प्रश्न पडळकरांनी उपस्थित केला.

सरकार नसताना ओबीसींसाठी आंदोलन करण्यासाठी धनंजय मुंडे रस्त्यावर उतरले, मात्र मंत्रिपदासाठी अजित पवार पुढे आले, असंही पडळकरांनी म्हटलं.

error: Content is protected !!