‘शरद पवार साडेतीन जिल्ह्याचे स्वामी, मी त्यांना मोठं मानत नाही’ – आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका

“शरद पवार साडेतीन जिल्ह्याचे स्वामी आहेत. शरद पवार मोठे आहेत हे मी मानत नाही, तुम्ही कोण मानत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे,” अशा शब्दांत भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. गोपीचंद पडळकर हे सोलापुरात बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी राष्ट्रमंचची बैठक 22 जून रोजी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस, आरजेडी, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे नेते आणि काही पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

या भेटीनंतर प्रमुख पक्षांची मोट एकत्र बांधून देशात नरेंद्र मोदी सरकारला आव्हान उभं करण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुरू केली आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पडळकर यांनी शरद पवार यांनी घेतलेल्या या बैठकीवरूनही टीका केली आहे. “मी लहान असल्यापासून शरद पवार हे भावी पंतप्रधान आहेत. त्यांना भावी प्रधानमंत्रीपदासाठी शुभेच्छा. रात गेली हिशोबात पोरगं नाही नशिबात अशी त्यांची परिस्थिती आहे,” अशा शब्दांत गोपीचंद पडळकरांनी पवारांवर हल्लाबोल केला.

error: Content is protected !!