मुंबईतील बोगस लसीकरण प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. मनिष त्रिपाठींचं आत्मसमर्पण

Mumbai Fake Vaccination

मुंबई : काही दिवसांपूर्वी मुंबईतील बोगस लसीकरण प्रकरण समोर आलं होतं. याप्रकरणी मुंबई महापालिकेनंही बोगस लसीकरण झाल्याचं मान्य केलं होतं. याप्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. मनिष त्रिपाठी यांनी पोलिसांमध्ये आत्मसमर्पण केलं आहे. अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळल्यानंतर त्रिपाठी यांनी पोलिसांमध्ये आत्मसमर्पण केलं आहे. मुंबईत उघडकीस आलेल्या बोगस लसीकरण प्रकरणातील लसी डॉ. मनिष त्रिपाठी यांनी पुरवल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यानंतर त्यांनी पोलिसांत आत्मसमर्पण केलं आहे. 

error: Content is protected !!