मुंबई | भाजपविरोधात देशात होणाऱ्या आघाडीबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. भाजपविरोधात होणाऱ्या नव्या आघाडीचं नेतृत्त्व शरद पवार करणार का?, यावर पवारांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली त्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
आघाडीची चर्चाच केली नसल्यामुळे नेतृत्वावरही चर्चा केलेली नाही. पण सामुदायिक नेतृत्व हेच सूत्र पुढे ठेऊन आम्हाला पुढे जावं लागेल. मी फार वर्ष असले उद्योग केले असल्याचं शरद पवार म्हणाले. त्यासोबतच सध्या त्यामध्ये न पडता त्यांना मार्गदर्शन करणं, शक्ती देणं, मदत करणं, त्यांना एकसंध ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं, शरद पवारांनी सांगितलं.
विरोधी पक्षांनी एकत्र येऊन जनतेला काही पर्याय द्यावा अशी लोकांमध्ये भावना आहे. ही लोकइच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी राजकीय नेतृत्वाची असते. ती जबाबदारी आम्हाला निश्चित पूर्ण करावी लागेल, असं शरद पवाप म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी मराठा आरक्षणावरही भाष्य केलं.
दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत अस्वस्थता दूर करण्यासाठी राज्य आणि केंद्राने भूमिका घ्यावी, जी मागणी आहे सुप्रीम कोर्टाने हा अधिकार केंद्र सरकारकडे आहे असं सांगितलं आहे, त्यामुळे केंद्राने भूमिका घ्यायला हवी, असं शरद पवार म्हणाले.