दिलासादायक: अडीच महिन्यातील निच्चांकी रुग्णवाढ, पॉझिटिव्हीटी रेट 3.45 टक्क्यांवर

भारतातील कोरोना संसर्गाचा वेग उतरणीला लागला आहे. गेल्या 24 तासांत देशात 60 हजार 471 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. मागील 75 दिवसांतील ही निच्चांकी रुग्णवाढ असून, दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट देखील कमी झाला आहे.

भारताचा पॉझिटिव्हीटी रेट कमालीचा खाली आला आहे. सध्या दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट 3.45 टक्के एवढा आहे तर, आठवड्याचा पॉझिटिव्हीटी रेट 4.39 टक्के एवढा खाली आला आहे. सलग आठव्या दिवशी देशातील पॉझिटिव्हीटी रेट पाच टक्क्यांपेक्षा कमी आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 कोटी 95 लाख 70 हजार 881 एवढी झाली आहे. त्यापैकी 2 कोटी 82 लाख 80 हजार 472 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. गेल्या 24 देशात तासांत 1 लाख 17 हजार 525 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

देशातील सक्रिय रुग्णांची संख्या दहा लाखाच्या खाली आली असून, सध्याच्या घडीला देशात 9 लाख 13 हजार 378 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशातील कोरोना मृतांची संख्या 3 लाख 77 हजार 031 एवढी झाली आहे. मागील 24 तासांत देशभरात 2 हजार 726 हजार 031 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. देशाचा मृत्यूदर 1.26 टक्के एवढा झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे देशाचा रिकव्हरी रेट 95.64 टक्क्यांपेक्षा अधिक झाला आहे.

देशात आजवर 38 कोटी 13 लाख 75 हजार 984 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 17 लाख 51 हजार 358 नमूने तपासण्यात आले आहेत. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

error: Content is protected !!