गेवराई : कोरोनामुक्त झालेल्या वृद्धाला कुटुंबीयांनी शेतात ठेवले. त्यांच्यासाठी जेवणाचा डब्बा घेऊन जाणाऱ्या त्यांच्या मुलासह आई, भावावर चौघांनी कोयता, लोखंडी पाईपने हल्ला चढविला. ही घटना गेवराई तालुक्यातील उमापूर येथे शनिवारी (१२ जून) रात्री घडली. (Coyote attack on the family of a coronated old man)
राजू बळीराम कापसे (रा. उमापूर) (Raju Baliram Kapase (Res. Umapur) )यांच्या फिर्यादीनुसार त्यांचे वडिलांना काही दिवसापूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला होता. उपचारानंतर कोरोनामुक्त झाल्यावर कुटुंबीयांनी त्यांना शेतात ठेवले. शनिवारी रात्री ८ वाजता राजू वडिलांसाठी जेवणाचा डब्बा घेऊन जात असताना त्यास गावातील गणेश प्रभु कापसे, प्रभु बबन कापसे, विठ्ठल बबन कापसे आणि ज्ञानेश्वर प्रभु कापसे या चौघांनी रस्त्यात अडविले आणि तुझे वडील पॉझिटिव्ह असतान तू गावात कसे काय फिरतोस असे म्हणत कोयत्याने डोक्यात वार केला. यावेळी राजूची आई हौसाबाई, भाऊ विजय, रवी नेमा कापसे, भावजय नंदा हे भांडण सोडविण्यासाठी आले असता त्या चौघांनी त्यांनाही कोयता, लोखंडी पाईप, दगड आणि दांडक्याच्या साह्याने बेदम मारहाण केली व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. याप्रकरणी चारही आरोपींवर चकलांबा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला.