एकत्र आलेल्या राजांचं स्वागत, पण त्यांचं बोलणं भाजपच्या मिठाला जागल्यासारखं; शिवसेनेचा खोचक टोला

Mumbai मुंबई | अनेक वर्षानंतर सातारा आणि कोल्हापूरचे राजे मराठा आरक्षणानिमित्त एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आज खासदार संभाजीराजे छत्रपती आणि खासदार उदयनराजे भोसले या दोन्ही राजेंची पुण्यात भेट झाली. संभाजीराजे आणि उदयनराजे यांच्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.(meeting of Sambhaji Raje and Udayan Raje)

अनेक बड्या नेत्यांनी या भेटीवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशातच आता शिवसेनेनं देखील या भेटीवर प्रतिक्रिया देत दोन्ही राजेंना खोचक टोला लगावला आहे. शिवसेना खासदार अरविंद सावंत (Shiv Sena MP Arvind Sawant)यांनी या भेटीवर प्रतिक्रिया देताना एकत्र आलेल्या राजांचं स्वागत पाण खासदार संभाजीराजे छत्रपती आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर टिकास्त्र सोडलं आहे. आज दुपारी ते माध्यमांशी बोलत होते.(MP Sambhaji Raje Chhatrapati and MP Udayan Raje Bhosale)

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर दोन्ही राजे एकत्र आले त्याचं स्वागतंच आहे. मात्र, दोन्ही राजे भाजपच्या कोट्यातून खासदार झाले आहेत. त्यामुळे केंद्राच्या भूमिकेबद्दल ते बोलत नाही. तर मिठाला जागल्यासारखं ते बोलत आहेत, असा खोचक टोला अरविंद सावंत यांंनी लगावला आहे.

तसेच अरविंद सावंत(Arvind sawant) यांनी यावेळी राम मंदिराच्या मुद्यावर देखील भाष्य केलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, राम मंदिराबद्दल आमच्या भावना स्पष्ट आहेत. धर्माच्या भावनांशी खेळू नका, राम मंदिर जमीन घोटाळ्याची चौकशी झाली पाहिजे.

राजे नीट वागत नसतील तर त्यांना आडवा आणि गाडा

error: Content is protected !!