राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्धा तापत असताना दुसरीकडे माओवाद्यांनी पत्रके काढून मराठा तरुणांना संघटनेमध्ये सामील होण्याचे आव्हान केले. तसेच माओवाद्यांच्या या पत्रकाला खासदार सचत्रपती संभाजी राजेंनी सुद्धा पत्रक काढून सडेतोड उत्तर दिले होते. आता त्या पाठोपाठ हाच मुद्धा उचलून धरत शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे (vinayak mete) यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
राज्य सरकारला यापूर्वीही अनेकवेळा आरक्षणाच्या प्रश्नी इशारा दिला आहे. आता ५ जुलैपर्यंत जर राज्य सरकारने आरक्षणासह इतर प्रश्न सोडवले नाहीत तर ७ जुलै रोजी होणारे पावसाळी अधिवेशन चालू देणार नाही. हि गोष्ट सरकारने लक्षात घ्यावी, असा इशारा यावेळी मेटे यांनी दिला. यावेळी मेटे यांनी माओवाद्यांनी मराठा आरक्षणप्रश्नी(maratha arakashan) पाठिंब्याच्या दिलेल्या पत्राबाबतही मेटे यांनी मत व्यक्त केले होते.
‘माओवाद्यांच्या सहनभूतीच्या जाळ्यात पिचलेले मराठा तरुण सापडले तर सामाजिक दृष्टीने महाराष्ट्राचे नुकसान होईल. माओवाद्यांच्या प्रश्नावर एकही प्रतिक्रिया सरकारकडून येत नाही हे दुर्दैव,’ असेही मेटे यावेळी म्हणाले होते. माओवादी संघटनांनी थेट पत्रके काढून मराठा समाजाच्या तरुणांना संघटनेत सामील होऊन आपल्या हक्काच्या लढ्यासाठी संगटनेत सामील होण्याचे आव्हान केले होते.