बीड तालुक्यात उडाली खळबळ
25 May :- बीडमध्ये कधी काय घडेल याचा नेम नाही. दोन-तीन दिवसांअगोदरच आष्टी तालुक्यात जन्मदात्या पित्याला मुलाने गोळ्या झडल्याची घटना ताजी असताना आता बीडमध्ये आणखी एक धक्कादाय घटना समोर आली आहे. किसन अंबादास तागड हे दारू पिऊन सतत घरी वाद घालायचे घरी शिवीगाळ करायचे या रागातून मुलगा लहू किसन तागड यांनी शेतात एकटे असल्याचा फायदा घेत कोयत्याने सपासप वार करत खून केला. मुलानेच बापाचा खून केल्याच्या या घटनेने बीड तालुक्यातील पिंपळनेर परिसरात खळबळ उडाली आहे.
आज २५ रोजी सकाळी ही धक्कदायक घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच उपाधीक्षक संतोष वाळके, पिंपळनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी सपोनि शरद भुतेकर, फौजदार सानप, सुरवसे वायकर यांनी घटनास्थळी धाव घेतली मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे आरोपी मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पिंपळनेरपोलिस ठाण्यात मयताचे भाऊ रोहिदास अंबादास तागड फेर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पिंपळनेर पोलिस करत आहेत.