‘या’ तारखेला बीडमधून निघणार मराठा आरक्षणासाठीचा संघर्ष मोर्चा

विनायक मेटेंचा सरकारला इशारा

(23 May) आता मराठा समाज बांधवांचा संयमाचा बांध फुटलाय म्हणूनचं शंभर टक्के आरक्षणासाठीचा मोर्चा निघणार आहे, असा इशारा आमदार विनायक मेटे यांनी बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेतून दिला आहे. तर हा मोर्चा मराठा आरक्षण संघर्ष मोर्चा लढा आरक्षणाचा या नवीन नावाने निघणार आहे, असंही मेटे म्हणाले आहेत. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर, बीडमध्ये 5 जून रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासंबंधी काही निर्णय घेण्यात आले आहेत. त्याचीच माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद घेण्यात आली होती.

ते पुढे म्हणाले, की राज्य सरकारच्या मनात पाप आहे, त्यामुळे ते समाजासाठी काहीही निर्णय करायला तयार नाहीत. सारथी योजनेचे पैसे विद्यार्थ्यांना मिळत नाहीत.आता आरक्षण देणे राज्य सरकारच्या हातात नाही.पण त्यांनी मराठा विद्यार्थ्यांना निदान इतर सुविधा तरी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. समाजाने केवळ ऊस तोडणी, शेतात काम करतच आयुष्य काढायचे आहे का? असा सवाल उपस्थित करत समाजाच्या प्रगतीसाठी मराठा समाज बांधवानी या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन देखील मेटे यांनी केले.

error: Content is protected !!