लॉकडाऊनमध्ये पोलीस यंत्रणा व्यस्त; दुचाकी चोरांचा धुमाकूळ सुरु

लॉकडाउन असल्याने रस्त्यावर वर्दळ कमी प्रमाणात असल्याने चोरांचे काम सोपे

(22 May)- सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू असतानाही दुचाकी चोरीचे थांबलेले नसून शहरासह तालुक्यात मोटरसायकल चोर दिवसाढवळ्या सत्र सुरु झाले असून शहरासह तालुक्यातील हरकी लिंबगाव फाटा येथून अज्ञात चोरट्याने दोन मोटरसायकल पळविल्या आहेत, गत सहा महीन्यापासून शहरासह तालुक्यात मोटारसायकल चोरांनी धुमाकुळ घातला असून कोरोनाचा संसर्ग सुरु असतानाही हे चोरटे आपले काम उरकत पोलीसांना आवाहन निर्माण करत आहेत.

शहर पोलीस स्टेशन सह ग्रामिण पोलीसात मोटरसायकल चोरीचे अनेक गुन्हे दाखल असतांना पोलीसांनी अद्याप कोणालाही अटक केली नसून गत दिड महीन्या पासून पोलीस लॉकडाऊन बंदोबस्तात असल्याने तालुक्यासह शहरात दुचाकी चोरांनी प्रताप दाखवण्यास सुरुवात केली आहे. तालुक्यातील सदोळा येथील राहवाशी सुरेश सुदाम धरपडे हे मंगळवारी मोटरसायकल क्र. एम एच ४४ एक्स ८३४४ वर माजलगाव येथील नरवडे कॉम्प्लेक्स, शिवाजी चौक येथे आले असता अवघ्या पंधरा मिनिटाचे कालावधित त्यांची मोटर सायकल चोरट्याने लंपास केला. तर मंगळवार रोजीच हारकी लिमगाव माऊली फाटा येथील बंडू एकनाथ गायकवाड यांची मोटर सायकल एम एच ४४ जे २५ ८३ शेताच्या बांधावर लावून ते शेतात गेले असता अज्ञात चोरट्याने त्यांची मोटर सायकल पळविली.

लॉकडाउन असल्याने रस्त्यावर वर्दळ कमी प्रमाणात असल्याने या चोरांचे काम सोपे होत आहे. तर पोलीस यंत्रणाही लॉकडाऊन मध्ये व्यस्त असल्याने त्यात भर पडत आहे. मात्र अशा शहरात व तालुक्यात पारंवार मोटरसायकल चोरी होत असतांना पोलीसांना चोरटे कसे सापडत नाहीत, असा प्रश्न नागरीकातून उपस्थित होत आहे.

error: Content is protected !!