मानवतेला काळीमा फासणारी घटना
(22 May)- आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या कोव्हिड सेंटरमध्ये वय वर्षे ९५ पेक्षा जास्त वय असणाऱ्या तीन वृध्दांना कोरोना झाल्यामुळे एक महिन्यापुर्वी कुटुंबीयांनी उपचारासाठी दाखल केले होते. हे तीन्ही रुग्ण सध्या कोरोनामुक्त झाली आहेत तरी यांना घरी घेऊन जाण्यासाठी कुंटुंबातील एकही माणुस येईना. नात्याला व मानवतेला काळीमा फासणारी घटना आष्टीत घडली आहे. डॉ. अमित डोके हे सध्यातरी या तीन्ही वृद्ध रुग्णांची काळजी घेत आहेत. आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयातीला नर्स, डॉक्टर करतात मनापासुन या वृध्दांची सेवा. या रुग्णांच्या कुंटुंबीयावर कायदेशीर कारवाई व्हायला हवी असे सर्वत्र बोलले जात आहे.