मुंबई : तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी सरकारला लक्ष्य करण्यास सुरुवात केली असून भाजपा नेते निलेश राणे यांनी एका वृत्तपत्रात छापून आलेल्या बातमीवरून वरळीचे आमदार आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. ज्याची सोसायटीचा वॉचमन व्हायची लायकी नाही त्याला आमदार केल्यावर लोकांना त्रास भोगावाच लागतो, अशी विखारी टीका निलेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर केली.
निलेश राणे ट्विटमध्ये म्हणतात, ज्याची सोसायटीचा वॉचमन व्हायची लायकी नाही त्याला आमदार केल्यावर लोकांना त्रास भोगावाच लागतो. वरळीकर टीव्हीवर पेंग्विन बघितला तरी शिव्या घालतायत. म्हणून मतदान करताना विचार केला पाहिजे नाही तर असा मनस्ताप होतो. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीही निलेश राणे यांनी आदित्य ठाकरेंना लक्ष्य केले होते.
चक्रीवादळानंतरचा वरळीमधला एक व्हिडीओ ट्विट करत राणे यांनी आदित्य ठेकरेंवर खोचक शब्दांमध्ये टीका केली होती. ‘हे चित्र वरळी मतदारसंघाचं आहे. वरळीकर विचारतायत तो ‘केम छो वरळी’ विचारणारा आमदार कुठे आहे? ती मुंबई पॅटर्नची पतंग कुठे गेली? एका पावसात वरळी पॅटर्न लोकांना दिसलं, सगळीकडे थुकपट्टी करून चालत नाही.’ अशा शब्दांत निलेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला होता.