खतांचे दर कमी करा – नवनाथ शिंदे
खरीप हंगाम तोंडावर आला असताना खतांच्या किंमतीमध्ये जवळ जवळ 700/800 रु गोणीमागे वाढवण्यात आले.
शेतकऱ्यांच्या मालाला अगोदरच हमीभाव नसताना या शेतीसाठी लागणारी रासायनिक खतामध्ये भरमसाठ वाढ केलेली दिसत आहे.
मालाला योग्य भाव नसल्याने शेतकरी अगोदरच संतप्त असताना खत वाढीमुळे शेतकरी अजूनच होरपळून चालला आहे.केंद्रसरकारला आम्हा शेतकऱ्यांची विनंती आहे की राजकारण थांबवा आणि खतवाढी संदर्भात पुनर्विचार करा.
कोरोना च्या महामारीमुळे आमच्या मालाला भाव मिळत नाही,आणि याच्यात च सरकार आमच्या जखमेवर मीठ चोळन्याचे काम करत आहे.
तुम्ही वेतनवाढ झाली नाही तर संपावर जाता,तुमच्यावर अन्याय होत असेल तर रस्त्यावर उतरता,मग आता आम्ही करू का संप ?
तुम्ही पिझ्झा बर्गर सहज 200 रु देऊन घेता,हॉटेल मध्ये 500 रु बिल भरता,मॉल मध्ये महागड्या वस्तू खरेदी करता,महागडी कपडे घेता मग शेतकऱ्याची मेथीची भाजी 5 रु का मागता ? कांदे 50 रु गेले तर महागाई वाढली म्हणजे तुम्हाला फक्त आमच्या वस्तूंचे 2 रु वाढले की दिसतात.
सरकारने जर याचा विचार केला नाही तर आम्ही आता हमाली करणे बंद करणार इथून पुढे 2 वर्ष काहीही पिकवनार नाही आमच्या पुरते आम्ही सेंद्रिय खतावर पिकवू , आता जगाचा विचार नाही करणार तुम्ही पैसे खाऊन जगा.
केंद्रसरकार ला आमचे एक आवाहन आहे तुम्ही याच्यावर विचार केला नाही तर आम्ही सर्व शेतकरी बांधव रस्त्यावर उतरु.
शेतकऱ्यांनो उठा जागृत व्हा आणि वेळेत या सरकारला धडा शिकवा.