‘देश जेव्हा जेव्हा भावुक झाला, त्यावेळी फाइल्स गायब झाल्या’, चीनवरून राहुल गांधींचा निशाणा

नवी दिल्लीः भारत आणि चीनमध्ये एलएसीवर तणाव कायम आहे. तर दुसरीकडे याच मुद्द्यावरून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. यावेळी राहुल गांधींनी कागदपत्रे हरवल्याच्या मुद्द्यावरून मोदी सरकारला घेरले आहे. जेव्हा जेव्हा देश भावुक होतो, त्याचवेळी फाइल्स गायब झाल्या आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

चीनच्या मुद्यावरून राहुल गांधी सतत सरकार सवाल करत आहेत. आता राहुल गांधी यांनी पुन्हा चीन मुद्द्यावर ट्विट केलंय. देश जेव्हा भावुक झाला, त्यावेळी फाइल्स गायब झाल्या. मल्ल्या असो की राफेल, निरव मोदी असो की चोकसी हरवलेल्या यादीमध्ये आता चीनच्या घुसखोरीच्या कागदपत्रांचा समावेश झाला आहे. हा योगायोग नाही, हा मोदी सरकारचा लोकशाहीविरोधी प्रयोग आहे, असा आरोप राहुल गांधींनी केला.

वायनाडमधून कॉंग्रेसचे खासदार असलेल्या राहुल गांधी यांनी आता चीनशी संबंधित कागदपत्रांवरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. संरक्षण मंत्रालयाच्या दस्तावेजावरून अलिकडेच बराच वादंग झाला. या वादामुळे हे दस्तावेज मंत्रालयाच्या वेबसाइटवरून काढून टाकले गेले.

आपण चीनसमोर उभे राहू शकतो हे विसरुन गेले. चीनचं नाव घेण्याचं धैर्य पंतप्रधान मोदींमध्ये नाही. चीनच्या घुसखोरीचे दस्तावेज संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाइटवरून काढून टाकण्यात आली, असं राहुल गांधी यापूर्वी म्हणाले होते.

संरक्षण मंत्रालयाने प्रथमच चीनच्या घुसखोरी कबुल करत अधिकृतपणे ही माहिती आपल्या वेबसाइटवर टाकली होती. पण राजकीय पातळीवर वाद वाढल्यानंतर हे दस्तावेज वेबसाइटवरून हटवण्यात आले. तसंच पंतप्रधान मोदी आपल्या संबोधनातून देशाशी खोटं बोलले का? असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला गोला होता.

मल्ल्याशी संबंधित कागदपत्र गायब

दुसरीकडे, पळपुटा उद्योगपती विजय मल्ल्या याच्या फाइलशी संबंधित काही दस्तावेज उपलब्ध नाहीत. विजय मल्ल्या खटल्याशी संबंधित महत्वाची कागदपत्रे फाइलमधून गायब झाल्याने सुप्रीम कोर्टाला सुनावणी पुढे ढकलावी लागली. आता या खटल्याची सुनावणी २० ऑगस्टला होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!