वीज पडून गर्भवती महिला ठार

नेकनुर परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

नेकनुर परिसरात जोरदार पाउस वारे आल्यामुळे शेतातील काम आटोपून घराकडे निघालेल्या महिलेवर वीज पडून महिलेचा जागेवरच मृत्यू झाला.राधाबाई दीपक लोखंडे वय 20 वर्ष रा. लोखंडे वस्ती नेकनुर ता. जि. बीड . या दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास शेतात काम करत होत्या.

पाऊस वारे सुटल्याने त्या घराकडे निघाल्या परंतु मध्येच त्यांच्या वर काळाने घाला केला. सदरील महिलेस नेकनुर च्या सरकारी दवाखान्यात दाखल केलें असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. सदरील महिला 8 महिन्या ची गर्भवती असल्याचे डॉक्टराकडून सांगण्यात आले.

error: Content is protected !!