पोलीसांनी भाजीपाला दिला रस्त्यावर फेकून

सकाळी 7 ते 11 या दरम्यान भाजीपाला विकण्याची परवानगी

राज्यात कोरोना संक्रमणाचा वेग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने राज्यात सर्वत्र कडक लॉकडाऊन जाहीर केलेला आहे. तर कोरोनाविषयक नियमांचे पालन न करणाऱ्या व्यापारी व नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. सकाळी 7 ते 11 या दरम्यान भाजीपाला विकण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र काही विक्रेते भाजीपाला विकत असल्याचे दिसून येते आहे .

चौसाळा येथे 11 नंतर काही व्यापाऱ्यांनी भाजीपाला विक्री करणे सुरुच ठेवले होते. त्यामुळे पोलीसांनी व्यापाऱ्यांचा भाजीपाला रस्त्यावर फेकून दिला होता. दरम्यान पोलीसांनी अशा पद्धतीने भाजीपाला रस्त्यावर न फेकून देता संबंधितांविरोधात दंडात्मक कारवाई करावी. भाजीपाला रस्त्यावर फेकून दिल्याने व्यापाऱ्यांचे व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.

error: Content is protected !!