गेवराई- कॅनॉलमध्ये मोटारसायकल पडून व्यापारी वाहून गेला

सदरील या व्यापाऱ्याचा शोध गेवराई पोलीस घेत आहेत

तलवाड्याहून गेवराईकडे मोटारसायकलवर येत असताना कॅनॉलमध्ये मोटारसायकल पडल्याने व्यापारी वाहून गेला. सदरील या व्यापाऱ्याचा गेवराई पोलीस शोध घेत आहेत. घटनास्थळी पोलीसांना मोटारसायकल आढळून आली आहे. विष्णू नन्नवरे (वय 55, रा. संजयनगर गेवराई) हे तीन दिवसांपुर्वी तलवाड्याहून गेवराईकडे येत होते. त्यांची मोटारसायकल कन्हेरवाडीजवळील कॅनॉलमध्ये पडली.

नन्नवरे विष्णू हे घरी न आल्याने त्यांचे नातेवाईक त्यांचा शोध घेत होते. त्यांची गाडी कॅनॉलमध्ये असल्याची माहिती कळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता सदरील मोटारसायकल विष्णू यांचीच असल्याचे निष्पन्न झाले. घटनेची माहिती एपीआय संदीप काळे यांना मिळताच त्यांनी आपले सहकारी प्रफुल्ल साबळे, बहिरवाळ, खटाणे यांनी पाहणी केली व विष्णू नन्नवरे यांच्यासोबत शोध सुरू केला.

error: Content is protected !!