पुणे : उच्चशिक्षित तरुणीवर पंचकर्म उपचार करण्याच्या बहाण्याने चित्रीकरण करुन ते सोशल मीडीयावर व्हायरल करण्याची धमकी देत तरूणीवर वारंवार बलात्कार केल्याप्रकरणात फॅमिली डॉक्टरला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली. त्याला 10 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.
सुरेश वाडीयार ( वय 36, कोंढवा) असे त्या डॉक्टचे नाव आहे. याबाबत 22 वर्षीय पीडित तरूणीने पोलिसात फिर्याद दिली आहे. ती मार्च 2018 पासून पाठ व खांद्याच्या दुखापतीच्या उपचारासाठी डॉक्टरकडे जात होती. बिबवेवाडी येथील अप्पर इंदिरानगर येथील शिवराजनगर येथे वाडीयार याचे आयुर नावाचे क्लिनिक आहे. वडीयार हा तरुणीच्या कुटुंबाचा फॅमिली डॉक्टर होता.