(22 एप्रिल)- ऑक्सिजनच्या मुद्यावरून जिल्हाधिकार्यांना धरलं धारेवर बीड जिल्ह्यात रेमडीसिविर इंजेक्शन वरून वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांना धारेवर धरलंय. दरम्यान यावेळी आमदार धस यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनातच गोंधळ घातला आहे.
जिल्ह्यात रेमडीसिविर इंजेक्शनचा काळा बाजार सुरू असून जिल्हा प्रशासनाचं यावर कोणतंही नियंत्रण नाही. आणि याच पार्श्वभूमीवर भाजपसह सर्व पक्षीय नेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली होती. आणि यावेळी जिल्हाधिकार्यां बरोबर झालेल्या बैठकीत धस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना धारेवर धरलं, तब्बल 15 मिनटं आमदार धस आणि अधिकाऱ्यांमध्ये खड्डजंगी झाली आहे.